जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या सहा विद्यार्थ्याना शैक्षणिक वर्ष २१- २२ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एस. परीक्षेत घव घवीत यश प्राप्त केले. या सहा विद्यार्थ्यांना पुढील चार वर्ष महाराष्ट्र शासनाची ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.

केंद्राच्या आर्थिक दुर्बल घटकातील झालेल्या परीक्षेत शाळेतील ज्ञानेश्वरी राजेश भोगिल ,आतार सानिया मतीन, निमोणकर अभिषेक सोमनाथ, डुचे ओम दादाभाऊ, त्रिभुवन आर्यन प्रकाश, काथवटे अथर्व महेश अशा एकूण 6 विद्यार्थ्यांना NMMS परिक्षेत यश मिळवले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षिका श्रीम. पवार मॅडम, बेलेकर मॅडम व तसेच मुख्याध्यापिका श्रीमती राळेभात मॅडम, शिक्षक हजारे सर, बांगर सर काकडे सर यांचे या विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व विदयार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विद्यार्थ्यां व शिक्षकांची जिद्द आणि चिकाटी ह्यामुळे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत होते विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुण रुजतात अशीच भागदौड कायम असू द्यावी त्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात मॅडम यांनी बोलताना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here