जामखेड प्रतिनिधी

नवीन मराठी शाळेची विद्यार्थीनी कु.ज्ञानेश्वरी राजेश भोगील ही शैक्षणिक वर्ष २१- २२ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एस. परीक्षेत मेरिटमध्ये येऊन घव घवीत यश प्राप्त केले.

सदर विद्यार्थ्यास पुढील चार वर्ष महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे एकूण 48 हजार रुपये सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ती पात्र ठरलेली आहे सदर विद्यार्थीनी प्रेस फोटोग्राफर तथा जामखेड तालुका मिडिया क्लब चे सदस्य राजेश भोगील यांची कन्या आहे.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या शालेयस्तर स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरी भोगील हीने 2 रा क्रमांक व तालुका स्तरावरील 3 रा क्रमांक पटकावला आहे. याच परीक्षेत शाळेतील ज्ञानेश्वरी राजेश भोगिल हीच्या सह ,आतार सानिया मतीन, निमोणकर अभिषेक सोमनाथ, डुचे ओम दादाभाऊ, त्रिभुवन आर्यन प्रकाश, काथवटे अथर्व महेश अशा एकूण 6 विद्यार्थ्यांना NMMS परिक्षेत यश मिळवले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षिका श्रीम. पवार मॅडम,बेलेकर मॅडम व तसेच मुख्याध्यापिका श्रीमती राळेभात मॅडम ,शिक्षक श्री. हजारे सर, श्री. बांगर सर यांचे त्यास मार्गदर्शन लाभले आहे.

या यशा बद्दल नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात मॅडम
,जामखेड तालुका मिडिया क्लब चे मार्गदर्शक फायकअली सय्यद, गुलाबराव जांभळे,अध्यक्ष सुदाम वराट सर, उपाध्यक्ष अशोक वीर, श्वेता गायकवाड, सचिव सत्तारभाई शेख, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत,सहसचिव पप्पुभाई सय्यद,खजिनदार राजेंद्र म्हेत्रे, सल्लागार संजय वारभोग, संपर्क प्रमुख धनराज पवार, अविनाश बोधले,किरण रेडे, संतोष बारगजे, राजेश भोगील,अजय अवसरे, संतोष गर्जे,वामन डोंगरे आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here