जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संचालक असलेल्या मातोश्री क्रीडा संकुलन व मातोश्री
लाल आखाडा यांच्यातर्फे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या अंतर्गतच आगामी गणेश उत्सवानिमित्त गणेश मंडळांना प्रोत्साहन व सन्मान मिळावा यासाठी त्यांच्या वतीने ही बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

जामखेड शहरातील जी गणेश मंडळ शासनाचे नियम अटी पाळून उत्कृष्ट देखावा करतील त्यांच्यासाठी मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लाल आखाडा यांच्यातर्फे पहिले बक्षिस ११००० रूपये व मानाची ढाल दुसरे बक्षीस ७००० रुपये व तिसर बक्षीस ३००० हजार जाहीर करण्यात आले आहे.

जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक हे मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लाल आखाडा चे संस्थापक अध्यक्ष असून ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवतात. ऐतिहासिक-धार्मिक-अध्यात्मिक तसेच विविध सामाजिक विषयांवरील पहिल्या तीन देखाव्यांना सर्वोकृष्ट बक्षीसे दिली जाणार आहेत
आसे मत मोहन (वस्ताद)पवार
संस्थापक अध्यक्ष – मातोश्री क्रिडा संकुलन,जामखेड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.






