जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेस जामखेड शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी तालुक्यातील मौजे शिऊर येथील गट क्र. ५२ ९ मधील ८.३३ हे.आर जमीन नगरपरिषदेस उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू असून शिऊर येथील ग्रामस्थाचे आरोग्य व पर्यावरणाची होणारी संभाव्य हाणी यामुळे सदर जमीन हस्तांतरणास विरोध करत जर परस्पर हस्तांतर झाल्यास शिऊर ग्रामस्थांच्या वतीने तिव्र अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बाबत आज दि. २५ ऑगस्ट रोजी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, माजी सरपंच ॲड. विश्वास निकम पाटील, युवक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब माने, संचालक विका सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव कडू, संचालक भगवान वाघमारे, उत्तम तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे शिऊर येथील गट क्रमांक ५२९ मधील पोट खराब क्षेत्र ८.३३ आर क्षेत्र जामखेड नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनासाठी मागणी केलेली आहे. परंतु हे क्षेत्र गावापासून जवळच असल्याने जर याठिकाणी संभाव्य घनकचरा प्रकल्प झाला तर यापासून शिऊर गावामध्ये प्रदूषण आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढून हे आरोग्यास धोकादायक होणार आहे.

तसेच गावामध्ये विविध विकास कामे करणे तसेच भविष्यामध्ये काही प्रकल्प उभारणे नियोजित असल्याने जागा राखीव ठेवणे गरजेचे असल्याने आणि सध्या या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आहे. तसेच त्यामध्ये वन्य प्राण्यांना पिण्यासाठी दोन नाला बल्डिंग, तसेच या जमीनीलगतच एक खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही जमीन नगरपरिषदे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास देण्यात येऊ नये यासाठी शिऊर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभा घेऊन तर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष सभा व मासिक सभा घेऊन सदर प्रकल्पाला विरोध करतानाच तिव्र अंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शिऊर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास विकास अधिकारी प्रकाश पोळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना निवेदने देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here