जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथील बस स्टॅण्डजवळ आपल्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट बघत बसलेल्या एका महीलेस तीला लीप्ट देण्याच्या बहाण्याने चार चाकी गाडीत बसवले. यानंतर तीचे तोंड दाबून चालत्या गाडीत पाच दरोडेखोरांनी तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण ६४ हजार रुपये लुटुन नेले.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा येथे फीर्यादी महीला ही दि ७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आपल्या भुम तालुक्यातील नळेवडगाव या ठिकाणी जाण्यासाठी खर्डा बसस्थानका जवळ गाडीची वाट बघत बसली होती. या वेळी त्या ठिकाणी आरोपी ड्रायव्हर त्या ठिकाणी चार चाकी गाडी घेऊन आला व सदर महीलेस लिप्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. गाडी पुढे खर्डा किल्ल्याजवळ थांबवली व त्या गाडीत आणखी चार अनोळखी व्यक्ती बसल्या व त्यांनी गाडी ताबडतोब पळविण्यास सुरुवात केली. गाडी सुरूच असताना ड्रायव्हरने मोठ्याने गाडीतील साउंडचा आवाज केला त्यावेळेस फिर्यादी यांनी आरडाओरड केला परंतु त्यातील त्यांच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने फिर्यादीचे तोंड दाबले व बाकी दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या कात्रीने महीलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कात्रीने कापुन काढून घेतले व तीच्या पाकिटामध्ये असलेले तीन हजार रुपये व मोबाइल देखील बळजबरीने काढून घेतला. असा एकुण महीलेकडील ६४ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

संबंधित महिलेने दि काल दि १३ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पाच अज्ञात दरोडेखोरांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर हे तपास करीत आहेत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here