जामखेड प्रतिनिधी

बबड्या तुझ्या शिवाय मी जगु शकत नाही, माझं जीवनच तुझ्या मुळं आहे तसं काही आधुरं डोक्यात आणु नकु, तुला मी आहे आपण कुंठ पण राहून सेवा करु, पण तु आता खावुन घे तुला माझ्या मासाची शपत आहे. असा संवाद आसलेल्या एका महाराजाची अॉडीओ कॉल रेकॉर्डिंग सध्या चांगलीच व्हायरल होत आहे आसल्याने पुन्हा आध्यात्मिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

मागिल चार दिवासांन पासुन एक महाराज आणि महीलेचा संवाद आसलेली अॉडीओ कॉल रेकॉर्डिंग जामखेड तालुक्यासह आष्टी पाटोदा सह शिरुर तालुक्यात फीरत आहे. हा महाराज बीड जिल्ह्य़ातील आसल्याची नागरीकांन मध्ये चर्चा आहे. यात महाराज मोठ्या गडावरील महंत आसल्याचे जाणवत आहे. तो. महीलेच्या प्रेमात बुडालाल्याचे दिसत आहे. आगदी गड सोडण्याची त्याची तयारी आहे. परंतु प्रेमलीला सोडणार नसल्याचे कॉल मधुन स्पष्ट होत आहे. बीड जिल्ह्य़ातील आष्टी, पाटोदा, शिरुर या ठिकाणी आनेक गड आहेत. या संस्थानांना विषेश महत्त्व आहे आता मात्र एका महाराजाच्या लिला मुळे भक्त मात्र हादरुन गेले आहेत.

चौकट

बीड जिल्ह्य़ात मोठ्या प्रमाणात गड आहेत. यातील पाटोदा तालुक्यातील हनुमान गड येथील प्रमुख बुवासाहेब खाडे महाराजा विरुध्द पंधरा दिवसांन पुर्वीच जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आजुनही खाडे महाराज फरार आहे. त्यामुळे महाराजांना झालयं काय असा प्रश्न भक्त मंडळांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here