आष्टी। प्रतिनिधी

तालुक्यातील भाळवणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे कार्यरत असलेले डाॅ.सुनिल गदादे यांना गेली २० वर्षांपासून पशुंची सेवा बरोबर च सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात वाढदिवस म्हटल की हजारो रुपयांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी सध्याची पिढी हजारो रुपये अनर्थ उडवताना दिसत आहे.पण याला अपवाद आहेत.ते डॉ सुनिल गदादे वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत गोरगरीब अनाथ निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करुन सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आष्टी शहरातील नवजिवन संगोपन केंद्रातील गोरगरीब अनाथ निराधार विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रात मदत व्हावी फुल ना फुलाची पाकळी का होईना समजाचे आपण काहितरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून डॉ.सुनिल गदादे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शैक्षणिक साहित्य वखाऊचे वाटप करुन विद्यार्थ्यांसमवेत बालगृहात सपत्नीक आपल्या कुटुंबासह वाढदिवस साजरा केला त्याच्या सामाजिक कार्याने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केल्याचा वेगळाच आनंद मिळतो असे डॉ.सुनिल गदादे यांनी सांगितले यावेळी सौ.संध्या सुनिल गदादे,व संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते.





