जामखेड प्रतिनिधी 

बसरवाडी या ठीकाणाहुन सकाळी आपल्या शेतातील काढलेला भाजीपाला विक्री करण्यासाठी मोटारसायकल वरुन जामखेडकडे येत आसताना मारुन मंदिराच्या जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बसरवाडी येथील शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

परमेश्वर प्रभाकर पिंपरे राहणार बसरवाडी (शिऊर) तालुका जामखेड आसे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बसरवाडी येथील प्रभाकर पिंपरे यांचा शेतीचा व्यावसाय आहे. त्यांनी आज दि १९ रोजी आपल्या शेतातील भाजीपाला काढुन तो विक्रीसाठी मोटारसायकलवर जामखेड येथिल बाजारात घेऊन येत होते. त्यांची मोटारसायकल जामखेड खर्डा रोडवरील मारुती मंदिराजवळ आली आसता त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या आपघात पिंपरे गंभीर जखमी झाले होते. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना समजली ते आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले व लोकांच्या मदतीने जखमीस रुग्णवाहिकेत टाकुन जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी तपासणी करुन सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आसल्याचे सांगितले.

यानंतर कोठारी यांनी सदर घटनेची माहिती जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड व मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे नेहमीच जखमींना मदत करत आसतात आजही ते आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले खुप तातडीने त्यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन जखमी पिंपरे यांना जामखेड ग्रामीण रुग्णालय घेऊन आले होते. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कोठारी यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here