जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आसलेले अमोलशेठ तातेड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित साकेश्वर गोशाळेतील गोमातांना कर्मचाऱ्यांन मार्फत मोफत हिरवा चारा वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

मित्रांचा कींवा मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस म्हटला की मोठ्ठी पार्टी, सेलिब्रेशन, नाच-गाणे, खाणे -पिणे, मोठ्ठाला केक कापणे, फोटो सेशन हे सगळे ओघाने येतेच. परंतु जामखेड येथिल सामाजिक क्षेत्रात नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आसलेले आमोलशेठ तातेड यांचा वाढदिवस सगळ्या गोष्टींना फाटा देत सामाजिक बांधीलकी जपत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित साकेश्वर गोशाळेतील गोमातांना मोफत हिरवा चारा वाटप करुन आपला वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे या चारा वाटप व वाढदिवसाचे नियोजन आशिर्वाद एन्टरप्रायजेस च्या कर्मचार्‍यांनी केले होते.

या वेळी कोठारी ज्वेलर्स व आशिर्वाद एन्टरप्रायजेस चे संचालक कांतीलालशेठ कोठारी, उमेश जाधव, भाऊ गळगटे, नारायण गव्हाणे, बाळु गोरे, मनोज जाधव, आशोक आजबे, बाबु ढगे, मयुर पाचंग्रे, निलेश तोटे, प्रमोद पवार, योगेश चव्हाण, शुभम चव्हाण, उमेश कात्रजकर, योगेश कवादे, हनु भोगल, आनंद कोळपकर, गोपाळ नेमाने, वैभव कुलथे, उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here