जामखेड प्रतिनिधी

अनावश्यक खर्चाला फाट देत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम चौधरी यांनी आपल्या नातीच्या वाढदिवस व ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळेतील गरजु व होतकरू ४५ मुलिंना मोफत शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करण्यात आले.

या वेळी विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती तेजश्री बिसेन, मंडल कृषी अधिकारी प्रशांत पोळ, नगरसेवक दिगंबर चव्हाण, प्रदीप राळेभात व मुक्तार सय्यद यांनीही गरजू मुलींना गणवेश भेट दिले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव एम. के. भोसले यांनी भूषविले होते. यावेळी श्री मधुकर आबा राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी.के. मडके, पर्यवेक्षक पी डी सोनवणे, सुनील वारे, दिलीप ढवळे, एम. डी. यादव, सुग्रीव ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयातील मुख्याध्यापिका कुसुम चौधरी यांनी मात्र एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देखील जामखेड शहरातील कन्या विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील उत्साहात संपन्न झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ चौधरी के. डी.यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य तसेच विद्यालयातील सर्व मुलींना मिष्टान्न भोजन देऊन समाज्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
कार्यक्रमावेळी बोलताना भोसले म्हणाले की, “जामखेड शहरातील कन्या विद्यालय हे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प व उपक्रमांसाठी ओळखले जाते.स्वतः मुख्याध्यापिका कुसुम चौधरी ह्या सुद्धा उपक्रमशील मुख्याध्यापिका आहेत आणि त्याचा थेट फायदा मुलींना मिळत असतो.आजही त्यांनी आपल्या दातृत्वगुणांचे आदर्शवत प्रदर्शन केले आहे.” सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब आंधळे व शंभूदेव बडे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री प्रकाश सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





