जामखेड प्रतिनिधी

श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था जामखेड विभागाच्या वतीने दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीन दिवसात भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या वतीने भारतीय खेळ, मल्लखांबावर अभिमानास्पद प्रात्यक्षिके सादर करुन तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

महाराष्ट्रामध्ये अनेक लोकप्रिय आणि पारंपरिक खेळ खेळले जातात त्या मधिल एक पारंपारिक खेळ म्हणजे मल्लखांब जो मराठी मातीतील खेळ म्हणून ओळखला जातो. हा खेळ एक व्यायाम प्रकार आहे. जो कमी वेळा मध्ये जास्त व्यायाम देण्यासाठी उपयुक्त ठरत आसतो. आजच्या क्रीडा विश्वात देखील आपले स्थान मिळवण्यासाठी लढणारा पारंपरिक खेळ म्हणून देखील मल्लखांब ओळखला जातो त्याच अनुषंगाने जामखेड येथिल श्री शंभुसुर्य मर्दानी प्रशिक्षण संस्था गेल्या आठ वर्षांपासून जामखेड शहरात विद्यार्थ्यांना मोफत मल्लखांब प्रत्यक्षीके शिकवत आहे.

भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने भारत शासनाच्या हर घर तिरंगा या अभियानात देखील शंभुसुर्य संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या वेळी सर्व विद्यार्थींनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवला. तिरंगा ध्वज शासनाने तीन दिवस ध्वजसंहितेत सांगितलेल्या नियमाप्रमाणे कसा फडकवावा , याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.बबलु (वस्ताद) टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.

याप्रसंगी संस्थेच्या वतीने भारतीय खेळ, मल्लखांबची सुरेख प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. मल्लखांबावर प्रात्यक्षिक सादर करून फडकविण्यात आलेल्या तिरंग्याने उपस्थितांचे मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र भांबे, सचिव अमोल निमोणकर तसेच आखाड्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी मोठे कष्ट घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here