जामखेड प्रतिनिधी
लोकमान्य तरुण मंडळ संचलित, नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीन दिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत शाळेतर्फे मुलांसाठी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले होते प्रत्येक मुलांनी आपल्या घरावर 3 दिवस तिरंगा ध्वज फडकावला.तिरंगा ध्वज फडकावताना तो कसा फडकावा,ध्वज संहिता या विषयीचे महत्व संस्थेचे कोषाध्यक्ष मा श्री. उमेशकाका देशमुख यांनी सांगितले.

शाळेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये दि. १३ अॉगस्ट २०२२ रोजी संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गोडाउन गल्ली – तहसिल कार्यालय रोड-जयहिंद चौक-खर्डा चौक- संविधान चौक-पेठ या मार्गे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीमध्ये विविध महापुरुष यांच्या वेशभूषा असणारी मुले सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता.

या फेरीमधे संस्थेचे सचिव राजेंद्र काका देशपांडे, कोषाध्यक्ष उमेश काका देशमुख, बंडोपंत पवार ,संचालक डॉ. प्रकाश खैरनार पालक या शिवाय सर्व शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी पूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले होते.

दिनांक १४ अॉगस्ट २०२२ रोजी संस्थेचे संचालक श्री.बंडोपंत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. दि १५ ऑगस्ट २०२२ रोजी फक्राबाद येथील माजी सैनिक माणिकराव देशपांडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. तसेच लोकमान्य टिळक भाषण व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव राजेंद्र काका देशपांडे, कोषाध्यक्ष उमेश काका देशमुख, संचालक डॉ.प्रकाश खैरनार बंडोपंत पवार, नंदुकाका देशमुख,मा. श्री. लक्ष्मीकांत देशमुख सर हजर होते.

यावेळी जिल्हा परिषेदेचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी तथा संस्थेचे संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांनी शाळेला १० व्हाइट बोर्ड दिले. इयत्ता १ ली मधील आर्यन संकेत पवार या विद्यार्थ्यांने शाळेसाठी २ फॅन दिले ,इयत्ता ३ री मधील शिवम नवनाथ राऊत याने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेस आर्थिक मदत केली. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी मुलांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमास पालक,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हजारे सर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात मॅडम यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.





