जामखेड प्रतिनिधी

देशाला ७५ वर्षे पूर्ण झाली आसुन पुढे देखील खुप मोठा विकास करायचा आहे. देशाच्या विकासा बरोबरच तालुक्याचा देखील विकास करायचा आहे. मात्र मी तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या प्रयत्नांना आनखी ताकद देऊन विकासकामे करणार आहे यासाठी मला तुमच्या सर्वांची आशीच साथ हवी आहे आसे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जामखेड शहरातील संविधान स्तंभ चौक येथे भव्य 100 फुट उंच (30 मीटरचा) तिरंगा उभारला आहे. 15 ऑगस्ट रोजी मतदारसंघातील वीरमाता, शासकीय अधिकारी व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा भव्य तिरंगा फडकविण्यात आला.

यावेळी आमदार रोहित पवार, डॉ. शोभा आरोळे यांच्या सह सर्व प्रशासकीय अधिकारी तहसीलदार योगेश चंद्रे, न्यायाधीश जगताप साहेब, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, महिला बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, बांधकाम विभागाचे अभियंता संजय कांबळे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, अशोक शेळके, वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, महावितरणचे अभियंता गावीत, कदम, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, रमेश आजबे, संजय वराट, प्रविण उगले, सुरेश भोसले, राजेंद्र पवार, मंगेश आजबे, अभय शिंगवी, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, अनिल देडे, मयुर भोसले, निलेश बोरा, संग्राम पोले, शोभा भोसले, पुजा राळेभात, बाळासाहेब काळे, लक्ष्मण भोरे, हर्षल डोके, अमित जाधव, प्रकाश काळे, अनिल बाबर, उमर कुरेशी, डॉ. कल्याण काशीद, जयसिंग उगले, खलील मौलाना, दिपक पाटील, चंद्रकांत राळेभात, महेश राळेभात, अमोल गिरमे, किसनराव ढवळे, डॉक्टर असोसिएशन, वकिल असोसिएशन, पत्रकार संघटना, यांच्या सह एनसीसी कॅडेट, ल. ना. होशिंग विद्यालय, नागेश विद्यालय, कन्या विद्यालय येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या सोहळ्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव व स्थानिक नागरिक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मतदारसंघातील अनेक विकास कामे तर आ. रोहितदादांच्या माध्यमातून मार्गी लागतच आहेत. शिवाय अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नावीन्यपूर्ण उपक्रम मतदारसंघात राबवल्याने परिसरातील नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे. मतदारसंघात पहिल्यांदाच अशा प्रकारे एवढा उंच तिरंगा ध्वज आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आला आसल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमास विश्वदर्शन टीम, बारामती अॉग्रो, तसेच प्रा मधुकर (आबा) राळेभात सह आनेकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर व शिवगंगा मत्रे तर आभार प्रा. मधुकर राळेभात यांनी मानले

चौकट

त्यागाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारा आपल्या सर्वांचा १०० फुट तिरंगा ध्वज जामखेड शहरात उभारला आहे. पुढील वर्षी कर्जत या ठिकाणी देखील असाच जिल्ह्यातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here