पाटोदा : प्रतिनिधी

पाटोदा मांजर सुभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ स्विफ्ट आयशर टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात आयशर गाडीच्या खाली स्विफ्ट अडकलेली असून गाडीमधील लहान मुला सह एकुण ६ जन जागिच ठार झाले आहेत. बीडचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या आपघाती निधनानंतर पुन्हा बिड जिल्ह्यातील याच दिवशी सहा जणांचा आपघात मृत्यू झाला आसल्याने बीड जिल्ह्य़ावर शोककळा पसरली आहे.

पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाची वाडी तालुका केज येथे जात असताना पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्या दरम्यान आयशर टेम्पो व स्विफ्ट कारचा अपघात झाला असुन सहा जण ठार झाले आहेत.

अपघात एवढा मोठा होता की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला होता. ही स्विप्ट काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली गाडीमध्ये अक्षरश शरीराचा चंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हजर झाले होते व सर्वांनी मिळून मृतदेह काढण्यास मदत केली आहे.






