जामखेड प्रतिनिधी

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने आज १३ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त जामखेड चे नगरसेवक मोहन पवार यांनी आपल्या प्रभागात तिरंगा झेंड्याचे वाटप केले आहे.

तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून हर घर तिरंगा या देशव्यापी अभियानात सहभागी होऊया तिरंग्याखाली एकत्र येऊय नागरिकांनी “हर घर तिरंगा” उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. राष्ट्रध्वजाचा आपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.

दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊया ! तसेच १५ तारखेला संध्याकाळी हा राष्ट्रध्वज सन्मानाने उतरावयाचा आहे. असेही आवाहन यावेळी मोहन पवार यांनी केले. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत नगरसेवक मोहन पवार यांच्याकडून प्रभाग नऊ मध्ये राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here