जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बटेवाडी येथे जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक मोहन पवार व उद्योजक उमेश माळवदकर यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

भाऊ-बहिणीच्या ऋणानुबंधांना आणखी घट्ट करणार सण म्हणजे राखीपौर्णिमा. याचे औचित्य साधून बटेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेची पावसाने गळत असलेली वर्गखोली व शाळा परिसरात कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत उपाययोजना करण्यासंबंधी नगरपरिषदेस संपर्क करून प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. नगरसेवक मोहन पवार, उद्योजक उमेश माळवदकर शिक्षक वृंद निकम मॅडम, शिल्पा साखरे मॅडम , कावळे मॅडम, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.





