जामखेड प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम अभियान हाती घेतले असून देशातील कोट्यवधी घरांवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकणार आहे. शासनाच्या या मोहिमेत कै.सुभाष कोठारी शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा विकास संस्था संचलित महावीर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थीही सहभागी झाले असून त्यांना आज ध्वजाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य रघुनाथ भोरे यांनी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा असल्याने हर घर तिरंगा मोहिमेदरम्यान राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे, यासाठी ध्वजसंहितेचे पालन करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.अशोक गायकवाड, प्रशासकीय अधिकारी प्रा.राहुल आहिरे, प्रा.विनित पंडित, प्रा.जाधव मँडम, झगडे मँडम, प्रा.तुपेरे मँडम, प्रा. नेटके सर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here