जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील धामणगाव परिसरात एक नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंगराळ भागात हा मृत बिबट्या आढळून आल्याने धामनगाव परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बिबट्याचा मृत्यू झुडपाच्या वेलीमध्ये पाय आडकुन व उपासमारीने झाला आसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी दिली.

मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. पाच महीन्यापुर्वी मोहरी परीसरात देखील बिबट्याची काही पिल्ले आढळून आली होती. त्यामुळे या डोंगराळ परीसरात बिबट्याचा वावर होत आहे हे नाकारून चालणार नाही. आता नर जातीचा बिबट्या धामणगावात मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बालाघाटात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. धामणगाव येथील वनविभागाच्या वनदरा हद्दीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. साधारण चार ते पाच दिवसापुर्वीच या बिबटय़ाचा मृत्यू झाला आहे. या भागात मादी बिबट्या पण असु शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध रहावे असे अवाहन धामणगावचे सरपंच महारूद्र महारनवर यांनी केले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी प्रविण उबाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुलदीप चौरै, कीसन पवार, शिवाजी चिलगर, शहाजी नेहरकर, भाऊसाहेब भोगल, हे घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाची पुढील कार्यवाही सुरू करुन या मृत बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुलदीप चौरै यांनी जाग्यावरच केले. सदर बिबट्याचा एक पाय याठिकाणी आसलेल्या झुडपातील वेलात अडुन झाला आहे. परीणामी त्याला शिकार करता आली नाही. त्यामुळे उपासमार झाली आसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे तसे शवविच्छेदनामध्ये आढळून आले आसलेल्याची माहिती वनविभागाकडुन मिळाली आहे.


चौकट
एक बिबट्या हा दिवसभरात शंभर कीलोमिटर चालत आसतो. हा मृत बिबट्या बाहेर जिल्ह्यातून भटकत धामनगाव या ठिकाणी आला आसावा. त्याचा पाय देखील झुडपाच्या वेलीत आडकला होता त्यामुळे त्याला जागेवरून हालचाल करता येत नव्हती त्याचे शवविच्छेदन केले असुन उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. जेथे मृत्यू झाला त्याच परीसरात त्याचा दफनवीधी करण्यात आला आहे.
(वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहन शेळके)






