जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील घोडेगाव येथिल मातोश्री पानंद रस्ते योजने अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या गैरव्यवहाराची व गावातील विविध झालेल्या विकास कामांची चौकशी करावी या मागणीसाठी घोडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्याचे पती हे अमरण उपोषणास बसले आहेत.

या उपोषण प्रहार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष भिमराव पाटील, शाखा उपाध्यक्ष बाबु राजेंद्र भोंडवे, शहर अध्यक्ष नयुमभाई सुभेदार, जालिंदर कल्याण भोंडवे, सागर नाना भोंडवे, जुनेद इकबाल सय्यद, शायद वजीर सय्यद, राम सुर्यभान भोंडवे, सुभाष बापु भोंडवे व जामखेड तालुका प्रहार संघटनेने उपोषणस्थळी भेट घेऊन पाठींबा दिला आहे.

मौजे घोडेगाव येथे मातोश्री पानंद रस्ते योजने अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करावी, प्रलंबित आसलेली गवळी वस्ती येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात यावे. घोडेगाव येथिल वर्ड क्रमांक १ मधिल अंगणवाडी क्र. २३ चे बांधकाम त्वरित करण्यात यावे. जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे २०१८ पासुन २ शिक्षक नसल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच मुलांच्या शौचालयाची देखील सोय नाही. तसेच ग्रामसभेत घरपट्टी व पाणीपट्टीचा होशोब दिलेला नाही तो देण्यात यावा

आशा विविध मागण्यांसाठी घोडेगाव येथिल ग्रामपंचायतीच्या सदस्या चे पती प्रभु नवनाथ गवळी दि ८ रोजी जामखेड येथिल तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणस बसले आहेत. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही आसे देखील बोलताना त्यांनी सांगितले. तसेच या सर्व कामांची चौकशी होऊन न्याय मिळाला नाही तर जामखेड तालुका प्रहार संघटनेच्या वतीने त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष जयसिंग उगले व शहराध्यक्ष नय्युमभाई शेख यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here