जामखेड नगरपरिषदेकडुन ८६ दिव्यांग व्यक्तींना नीधी वाटप – मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना शासन निर्णयानुसार नगरपरिषद निधी मधून लाभ मिळणे कामी त्यांच्या दिव्यांगत्व टक्केवारी नुसार नगरपरिषदेकडे विहित कालावधीत प्राप्त झालेल्या एकूण ९० अर्जांपैकी ८६ लाभार्थींना नगरपरिषद निधीतून दिव्यांग नीधी वाटप करण्यात आला.

वैयक्तिक लाभ हा दि .१ अॉगस्ट रोजी देण्यात आला आहे. लाभाची रक्कम एकूण लाभार्थी दिव्यांग टक्केवारी ४० ते ६० टक्के १६८०००, रूपये ६१ ते ८१ टक्के ७७००० रूपये, ८१ ते १०० टक्के १८००००रूपये अशी एकूण ४२५००० रूपये दिव्यांग पात्र लाभार्थी यांचे राष्ट्रीयकृत बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत. अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी दिली आहे.

तरी जामखेड नगरपरिषद हद्दीतील उर्वरित दिव्यांग लाभार्थी यांनी कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात अर्ज करण्याचे जाहीर आव्हान याद्वारे करण्यात येत आहे. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी केले आहे. हा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी देखील जामखेड प्रहार संघटनेने देखील पाठपुरावा केला होता.





