आष्टी प्रतिनिधी

जामखेड – नगर रोडवरील वाघळूज घाटात तेलाने भरलेला टँकर पलटी झाला. पलटी झालेल्या तेलाच्या टॅंकर मधील तेल लोकांनी गर्दी करत पळुन नेले तर काही तेल खाली सांडल्याने तेलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जामखेड – नगर रोडवरील अंभोरा ते वाघळूज दरम्यान असलेल्या घाटात दि ४ अॅगष्ट रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास नगरहून जामखेड च्या दिशेने जाणाऱ्या टॅंकर ला अपघात झाला.रस्त्यावरून टॅंकर खाली गेल्याने यातील ड्रायव्हर बेशुद्ध पडला ,टॅंकर पलटी झाल्याने टॅंकर मधून तेल गळत होते. सायंकाळी हा अपघात झाल्यानं अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने ,ड्रम, हांडे घेऊन तेल मिळेल तसे तेल लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या टॅंकर भोवती मोठी गर्दी झाली होती.उशिरा टॅंकर उभा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here