जामखेड प्रतिनिधी
इन्स्पायर अबॅकस अकॅडमी द्वारे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जामखेड येथिल तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले, या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आले.

जामखेड येथिल संस्कार मुळे, सोहम बन, केतन पठाडे, आशा तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गैरवण्यात आले. सनराईज एज्युकेशन सोसायटी संचलित, इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ने नुकत्याच घडलेल्या राज्यस्तरीय ऑफलाईन अबॅकस स्पर्धा मुक्ताई लॉन्स, चऱ्होली फाटा, पुणे या ठिकाणी आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 627 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. साधनाताई तापकीर (पिंपरी चिंचवड मनपा विद्यमान नगरसेविका), सौ. सुवर्णाताई बुर्डे (पिंपरी चिंचवड मनपा विद्यमान नगरसेविका), डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, जि. प. ठाणे), सुनील कुऱ्हाडे (माजी शिक्षणाधिकारी, जि.प.पुणे), गोपाळभाऊ रक्ताटे (माजी सभापती पंचायत समिती आष्टी), हरिष चौधरी (अध्यक्ष पिंपरी चिंचवड खाजगी अनुदानित शिक्षक पतसंस्था भोसरी, पुणे), मंगेश कारखिले (अभियंता पुणे), तानाजी लोहकरे (संगीत विशारद, आदर्श शिक्षक जिजामाता विद्यालय भोसरी पुणे) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक समारंभ पार पाडला.

इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ने घेतलेल्या क्लासेस मुळे मुले अंकगणितात हुशार होतात; मुले संगणक व कॅल्क्युलेटर पेक्षा जलद गतीने गणिते सोडवतात; मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलन शक्ती व आत्मविश्वास यामध्ये वाढ होते. या क्लासेसमुळे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय उपयोग होतो. नुकतेच या स्पर्धेचे आयोजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले व सर्वच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

या स्पर्धेत राज्यभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आदित्य लोखंडे, आदित्य सोनवणे, आदित्य मुळे, स्वरा शिंदे, विराज निकम, केतन पठाडे, संस्कार मुळे, पृथ्वीराज पाटील, कृष्णा खांदवे, साईराज खंडागळे, सार्थक झगडे, स्वरा राख, आदित्य गायकवाड, स्वरूप विधाते, रामेश्वरी तापकीर, सृष्टी वामन, समृद्धी साठे, चैत्राली वाळके, सोहम बन, सिद्धेश शिंदे व नैतिक शिंदे या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी चे सर्वोत्तम पारितोषिक मिळविले. तसेच अकॅडमीच्या कार्यात आपल्या कर्तुत्वाची छाप पाडणाऱ्या सौ. मंजू पाटील, सौ. सुमनकुमारी गुप्ता, सौ. सायली गाडेकर, सौ. अर्चना मोरे मॅडम यांना बेस्ट टीचर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सौ. सत्यशीला भद्रे व संचालिका सौ अर्चना शेळके मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना या कार्यात अकॅडमीतील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सागर हिरवे, प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप भद्रे व आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. दादासाहेब शेळके यांनी केले.





