जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बावी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने जि प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अशा प्रकारे वेगवेगळया घोषणा करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी उपस्थित गावचे उपसरपंच दादासाहेब मंडलिक,
माजी सरपंच दादासाहेब पवार, सदस्य राम पवार,डॉ.आनंद पवार,अमर पवार, रामकृष्ण पवार,राहुल पवार,राहुल मंडलिक,बबन मंडलिक,शंकर पवार,गोवर्धन पवार, इन्नुस सय्यद,संतोष अडसूळ अशोक राऊत,कोंडीबा शिंदे,मधुकर पवार,गणेश जरक, छत्रगुन जगताप दगडू समुद्र ,शिक्षक वर्ग आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तूपरे सर,शिक्षक द्वारके सर,जगताप मॅडम ढाकले सर आणि डॉ.आनंद पवार यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहितीपर भाषण केले.






