जामखेड प्रतिनिधी

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे गट व गणवार आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यात इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने जवळा जिल्हा परिषद गटात ओबीसी पुरुष आसे आरक्षण पडल्याने भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य पै. शरद कार्ले यांनी देखील आपल्या जवळा गटात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याच मोर्चे बांधणीला त्यांना जवळा गटात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणा बरोबरच समाज कारत सक्रिय राहुन त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. जवळा गटातुन भाजपा कडुन जिल्हा परिषद साठी ते इच्छुक आसुन नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता आपणच विजयाचे दावेदार आसणार असा ठाम विश्वास देखील माजी पंचायत समिती चे सदस्य व भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पै. शदर कार्ले यांनी आपल्या रोखठोक न्यूज ने घेतलेल्या मुलाखती दरम्यान बोलताना व्यक्त केला.

पै. शरद कार्ले यांचा राजकीय प्रवास हा त्यांच्या ग्रामपंचायत पासुन सुरु झाला. अतिशय शांत व संयमी आसे नेतृत्व आसलेले पै. शरद कार्ले यांनी ग्रामपंचायत कुसडगाव या ठिकाणी २०१० साली सरपंच म्हणून काम केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्र आसेल ग्रामपंचायत कार्यालय, भोगलवाडी आंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण, अंगणवाडी बांधकाम, सरदवाडी अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण आसे विविध कामे मार्गी लावले होते. २०१० साली कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी गाळे उपलब्ध करुन दिले. भोगलवाडी येथील वाघा वस्तीवर देखील सिंगल फेज योजना सुरू केली.

सरपंच म्हणून काम करत आसताना पै. शरद कार्ले यांचा राजकीय प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. ग्रामपंचायत काळात सरपंच आसताना केलेल्या विकास कामांची पावती देखील त्यांना मिळाली. त्यांना वाढता प्रतिसाद मिळाला आसल्याने २०१२ साली कॉंग्रेस पक्षाने पंचायत समिती अरणगाव गणाचे तीकीट पै. कार्ले यांना दिले आणि ते या निवडणूक निवडुन आले. पुढे २०१२ ते २०१७ पर्यंत पंचायत समितीचे सदस्य म्हणून देखील लोकांची सेवा केली. या मध्ये अरणगाव गणात वाड्या वस्त्यांनवरील रस्त्याची कामे केली. आरणगाव गणात प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप, हायमॅक्स दिवे, तसेच लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना गरजु पर्यंत पोहचवण्याचे काम केले. पंचायत समितीच्या कृषी विभागा आंतर्गत शेतकर्‍यांना अनेक विहिरी मंजुर करुन दिल्या.

पुढे माजी पंचायत समितीचे सदस्य पै. शरद कार्ले यांनी भाजप मध्ये प्रवेश करुन जवळा, आरणगाव, नान्नज परीसरात भाजपच्या माध्यमातून लोकांची नाळ जोडण्याचे काम केले. याचीच पावती म्हणून माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी त्यांच्यावर भाजपा युवा मोर्चाची जबाबदारी सोपवली. भाजपची वाढती जबाबदारी लक्षात घेऊन पै. शरद कार्ले यांनी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. भाजपा युवा मोर्चाची धुरा सांभाळत आसताना तालुक्यातील शेतकऱ्यांना मका व कापुस केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. अतिवृष्टीमुळे झालेल्या कांदा पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तसेच मका व कापुस हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. शेतीपंपाचा विजपुरवठा रात्री होत होता त्यावेळी हा विजपुरवठा दिवसा करण्यासाठी देखील मागणी केली होती. कोरोना काळात युवा मोर्चाच्या माध्यमातून कोविड योध्दा म्हणून माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत आरोळे हॉस्पिटल येथील आरोग्य कर्मचार्‍यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित केले. तसेच प्रा राम शिंदे व खासदार डॉ.सुजय वीखे यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा देखील भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून भरवण्यात आल्या होत्या. तसेच मागील आडीच वर्षांच्या काळात विरोधी सरकार आसल्याने शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध आंदोलने, मोर्चे व रास्तारोको देखील करुन शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवीले आहेत.

नुकतेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे गट व गणाचे आरक्षण जाहीर झाले आसल्याने ओबीसी पुरुष मधुन युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पै. शरद जवळा जिल्हा परिषद गटातुन भाजप कडुन उमेदवारीसाठी इच्छुक आसुन उमेदवारीसाठी त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आसल्याने ते देखील जवळा गटात जोरदार तयारीला लागले आहेत. जिल्हा परीषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आसणार आहे. तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळा गटात रस्त्यांचे जाळे पसरवण्यात येईल. तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. तरुणांचे चांगल्या प्रकारे आरोग्य रहावे व त्यांच्यावर चांगले संस्कार निर्माण व्हावेत यासाठी गाव तेथे तालीम उभारण्यात येईल. जिल्हा परिषदेवर निवडुन आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना देखील लोकांन पर्यंत पोहचवण्याचे करणार आसल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पै. शरद कार्ले यांनी रोखठोक न्यूज शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here