जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथील सकल जैन समाजाच्या वतीने महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत जैन बांधवांनी “आज का दिन कैसा हो सोने से भी महंगा है” |, “हुलशानंदन वीर की जय बोलो आनंद की|” , “जयकारा गुरूदेव का काजु बदाम पिस्ता गुरूदेव हमारा हसता| अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. या दरम्यान राज लॉन्स येथे हैदराबाद येथील प्रसिद्ध भक्तिगीत गायक आयुशजी कोठारी यांच्या भक्तीगीतातून जैन बांधव व इतर समाजबांधव मंत्रमुग्ध झाले होते. मिरवणूकीची सांगता झाली यावेळी विविध ठिकाणावरून जैन सकल बांधव आले होते.
राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज यांची जयंती जामखेड येथे प्रथमच आयोजित करण्यात आली होती. बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून चंदन बाबाजी म. सा. आदी ठाणा यांच्या मंगलपाटने या शोभायात्रेची सुरवात झाली. आचार्य सम्राट गुरूदेव प. पू. आनंदऋषी म. सा. यांची सजवलेल्या रथात प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी जैन बांधव, महिला व मुली यांनी परिधान केलेले विशेष वस्त्र शोभायात्रेचे आकर्षण ठरले. राज लॉन्स येथे शोभायात्राचे विसर्जन करण्यात आले. यावेळी लिंबागणेश दिंडी भजनी मंडळाने आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले.

या वेळी कर्जत जामखेड च्या दोन्ही आमदारांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती. राष्ट्रसंत आनंदॠषी महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या समाजाला प्रेरणादायी ठरतील. शांतता, संयम व नम्रता या गुणांचे आपण अनुकरण केले तर आपणासही काहीही कमी पडत नाही. महाराजांच्या विचारांवरच आनंदॠषी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. यामुळे गोरगरीब जनतेला माफक दरात आरोग्य सेवेचा फायदा मिळत आहे असे मत माजी मंत्री व आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, आचार्य आनंदॠषी महाराजच्या जन्मगावी गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळते. आचार्य आनंदॠषी महाराजांनी सामान्य लोकांना समजेल असे ज्ञान दिले. देशभरात भ्रमंती केली. आजही समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी संतांचे विचारच प्रेरणादायी ठरतात. पुढील पिढीला संतांचे विचार समजावेत म्हणून अशा कार्यक्रमाची खरोखरच गरज आहे.

या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, पिटु शेठ बोरा, महावीर बाफना, अभय शिगवी, अशोक बोरा, किशोर पितळे, अशोक कोठारी, विजय कोठारी, रमेश कटारिया, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, रमेश गुगळे, दिलीप बाफना, प्रविण चोरडिया, अशोक बाफना, सुनील कोठारी, पवन राळेभात, अमित चिंतामणी, अमोल गिरमे, शरद कार्ले, मनोज कुलकर्णी, सोमनाथ पाचरणे, पोपट राळेभात, तात्याराम पोकळे, राहुल बेदमुथ्था, मोहन पवार, नितीन सोळंकी, राहुल उगले, परंतु बोरा, अशोक शिंगवी, शितल शिंगवी, विकास राळेभात, कांतीलाल खिवंसरा, विनोद नवले, प्रविण सानप, महावीर बाफना, महेश कटारिया, यांच्या सह परिसरातील जैन संघाचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





