जामखेड प्रतिनिधी
सत्ता बदल झाला आसला तरी मंजुर आसलेली विकास कामे थांबनाणार नाहीत. कारण बजेट मध्ये घेतलेली कामे स्थगित करता येत नाहीत. कर्जत जामखेड च्या विकास कामांना पुढे देखील नीधी कमी पडु देणार नाही. विरोधक श्रेयवादाचा प्रयत्न करतील, विरोधकांनो श्रेय लाटण्यानचा प्रयत्न करु नका कारण जनता सब कुछ जानती है असा टोला आमदार रोहित पवार यांनी जामखेड दैऱ्यावर असताना विरोधकांना केला.

जामखेड येथे २ अॉगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने कर्जत जामखेड चे आ रोहित पवार हे पहाणी करण्यासाठी व विविध दालनांचे उद्घाटन करण्यासाठी जामखेड येथे आले होते. या वेळी त्यांनी नागेश्वर मंदिर, पालखी मार्ग व आनंद नगरी भरत आसलेल्या भागाची पहाणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की मतदारसंघात येत आसलेला नीधी फक्त कर्जत जामखेड ठीकाणी स्थगित झाला नसुन राज्यातील सर्वच कामांना सध्या स्थगिती आहे ही स्थगिती लवकरच उठणार आहे. या बाबत मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असुन ते देखील सकारात्मक दुष्टीकोणातुन मदत करतील. बजेट मध्ये जी कामे मंजूर आहेत ती कामे स्थगित करता येत नाहीत.

कर्जत जामखेडच्या विरोधात सरकार आसले तरी मी पवार कुटुंबातील आसल्याने मतदार संघात नीधी आणण्यासाठी मंत्री व आधिकारी यांच्या दालनात बसुन नीधी मंजुर करुन आनेल. सत्ता नसतानाही विकास कामांना नीधी कमी पडु देणार नाही. श्रेय वादाचा प्रयत्न विरोधक करतील मात्र विरोधकांनो श्रेय लाटण्यानचा प्रयत्न करु नका जनता सब कुछ जानती है असा टोला आ. रोहित पवार यांनी विरोधकांना लावला.

या नंतर जामखेडमध्ये पुरातन नागेश्वर मंदिर असून श्रावण सोमवारी इथं दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर नागेश्वर मंदिर परिसराची पाहणी करून दर्शन घेतलं. तसंच पालखी मार्गाचं काम सुरु असून या कामाचीही पाहणी करुन आवश्यक त्या सूचना आ. रोहित पवार यांनी दिल्या. यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, विकास राळेभात, पवनराजे राळेभात, अमित जाधव, मोहन पवार, अमोल गिरमे, ईस्माईल सय्यद, प्रविण उगले सा. बा. विभागाचे कांबळे साहेब सह अनेक जण उपस्थित होते.






