जामखेड प्रतिनिधी
अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम आता वाजले आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदार प्रारूप यादी दि २० रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक २०२२ करीता प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्याअनुषंगाने जामखेड तालुक्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या दि २० रोजी तहसिल कार्यालय जामखेड व पंचायत समिती कार्यालय जामखेड येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

तरी ज्या नागरीकांना मतदार याद्या पहायच्या असतील त्यांना पंचायत समिती कार्यालय जामखेड व तहसिल कार्यालय जामखेड येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. व ज्यांना मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी दि. २५ जुलै २०२२ पर्यंत आपला तक्रार अर्ज तहसिल कार्यालय जामखेड येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावा. दि. २५ जुलै २०२२ नंतर आलेला तक्रार अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. याची जामखेड तालूक्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.






