जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील साकत येथिल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलित साकेश्वर गोशाळा येथील गोमातांना पुरणपोळ्या खायला घालून आपली मुलगी कु समुद्धी या आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करून प्रा. सचिन गायवळ परिवाराने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

आज दि. १८ रोजी सकाळी ९ : ०० वाजता गोशाळेतील गोमातांना कु. समुद्धी सचिन गायवळ हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गायवळ परिवाच्या वतीने पुरणपोळ्या देउन वाढदिवस साजरा करण्यात आला. सचिन गायवळ परिवार हा नेहमीच धार्मिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी असतो.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सर्वांना आवहन केले की, प्रत्येकाने आपला वाढदिवस गोशाळेत साजरा करावा. हिंदुधर्मात गाईचे खुप महत्त्व आहे. आपला भारतीय स्वदेशी गायींचा वंश टिकला पाहिजे. जोपर्यंत गाय दुध देते. तोपर्यंतच गाय सांभळली जाते मात्र ती म्हतारी झाली की, कतलखान्यात विकतात. हे पाप करु नका, आपल्या गोमातेच महत्त्व समजून घ्या.

जनजागृती करा पशुधन टिकले पाहिजे. यावर आपला देश चालतो हे विसरता कामा नये. कृषीप्रधान देश आपला आज आपणच स्वदेशी भारतीय वंश नाहिसा करु लागलो आहोत. सर्व हिंदुना विनंती आपण पुढे होउन गोमाता वाचली पाहिजे आणि आज समुध्दी सचिन गायवळ या कुमारी ने जसे आपला वाढदिवसाचा खर्च टाळुन गोशाळेतील गाई वासरांना पुरणपोळ्या देउन वाढदिवस साजरा केला तसच आपणही करुया असे आहवाहन करण्यात आले यावेळी सचिन गायवळ व मित्र परिवार उपस्थितीत होता.






