जामखेड प्रतिनिधी

घरची आर्थिक परिस्थिती बिकट आसुन देखील जामखेड येथील रीक्षा चालक सादीक शेख यांनी कसलाच लालचीपणा न दाखवता जामखेड पोलिसांच्या मदतीने त्याच्या रीक्षात विसरलेले गळ्यातील सोने व बॅग प्रामाणिकपणे पुन्हा महीलेच्या ताब्यात दिले. त्यामुळे आजुनही प्रामाणिकपणा हरवलेला नाही ते वरील घटनेवरून दिसुन येत आहे.

रिक्षाच्या तोडक्यामोडक्या कमाईवर घर चालवणाऱ्या सादीक गुलाब शेख रा. मोरे वस्ती, जामखेड हे आपली रीक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे सकाळी बस स्थानक येथुन एका महीला प्रवाशाचे भाडे घेऊन त्यांना घरी सोडले. यानंतर पुन्हा त्यांना दुसऱ्या महीला प्रवाशी आसलेल्या सुनिता हजारे यांनी जुन्या बस स्थानकाजवळ रीक्षाला हात दाखवला व रीक्षा बसुन पेशंट घेऊन दवाखान्यात जायचे आहे आसे सांगितले या वेळी त्यांच्या कडे एक सामानाची बॅग होती. या बॅग मधे सोन्याचे दागिने देखील होते. पेशंट हॉस्पिटल मधुन घरी सोडल्यावर मात्र त्यांची बॅग रीक्षामध्येच विसरली. या नंतर रीक्षाचालक सादीक शेख यांनी दोन तीन महीलांचे देखील रीक्षाचे भाडे केले. मात्र उशिरा त्यांना रीक्षात एक बॅग प्रवाशी महीला विसरलेली आहे हे लक्षात आले. मात्र बॅग घेण्यासाठी कोणीच आले नसल्याने व नेमकी कोणत्या महीलेची बॅग विसरली आहे हे माहीत नसल्याने शेवटी ती बॅग जामखेड पोलीस स्टेशनला घेऊन गेले व पोलीसांनकडे जमा केली.

 

यानंतर जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सदर बॅग बाबत दिवसभर माहिती घेतली असता ती बॅग जामखेड शहरातील शिवाजी नगर भागात रहाणार्‍या सुनिता हजारे यांची आसल्याची खात्री केली.

या नंतर दि ९ रोजी रात्री सदर महीलेस जामखेड पोलीस स्टेशनला बोलवुन सोने व बॅग महीलेकडे सुपूर्द केली. त्यामुळे या महीलेने सर्वांचे अभार मानले. रिक्षाचालक सादीक शेख याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कौतुक केलं आहे.

या वेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पो. ना. अजय साठे, पो. कॉ. नवनाथ शेळके, पो. कॉ. आबासाहेब अवारे, रीक्षा युनियन चे अध्यक्ष अमित चिंतामणी, उपाध्यक्ष आसिफ सय्यद, सचिव नासिर खान, समिर शेख, कय्युम शेख, अशिर बागवान, आशपाक सय्यद हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here