जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगर रोडवरील चिंचपुर सरहद्दीवर चोरटी वाहतूक करणारा टिपर घेऊन जात असताना तो महसुल पथकाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या पथकाच्या वाहनाला त्याच्या दुसर्‍या वाळू तस्कराने गाडी आडवी लावल्याने वाळू वाहतूक करणारा टिपर पसार झाला. या प्रकरणी कामगार तलाठी यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अज्ञात हायवा टिपर व चार चाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी राजुरी येथिल तलाठी सचिन किसन खिळे हे दिनांक २३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जामखेड नगर रोडवरील चिंचपूर सरहद्दीजवळ एका हाॅटेल समोर गस्त घालत असताना या रोडवर वाळू वाहतूक करणारा हायवा टिपर क्रमांक एम. एच. १६ सी. डी ४१०१ हा चोरटी वाळू घेऊन जात होता यावेळी सदरच्या हायवा टिपर ला फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला यावेळी टिपर चालक टिपर सह पळून जात असताना सदर टिपरचा पाठलाग महसूल विभाग करत आसताना दुसर्‍या आरोपी चारचाकी वाहन चालकाने त्यांची चारचाकी फिर्यादीच्या वाहनास आडवी लावून अडथळा निर्माण केला त्यामुळे सदर अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर पळून गेला.

या प्रकरणी टिपर पळून लावण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हैवा टिपर व चारचाकी चालक ( नाव माहीत नाही) यांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत. पोलीसांनी हैवा टिपर व चारचाकी असे दोन्ही वाहने जप्त केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here