जामखेड प्रतिनिधी

समृध्दी कॉम्प्लेक्स मधील युनिव्हर्सल स्पोर्टच्या दुकानांसमोरील कॉलमला दुकानाच्या जाहीरातीचे बॅनर दुकानदार व त्याचा मित्र चिटकावीत असताना सहा जणांच्या टोळक्याने येथे बॅनर लावायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पाठीवर छातीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर
मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर खुनाचा प्रयत्नान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुरज अशोक निमोणकर यांचे जामखेड पंचायत समिती समोरील समृध्दी कॉम्प्लेक्समध्ये १७ नंबर गाळ्यात युनिव्हर्सल स्पोर्टचे दुकान आहे. या दुकानांसमोरील कॉलमवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुकान चालक सुरज निमोणकर व त्याचा मित्र विकास कचरू साळुंके हे स्पोर्टच्या जाहिरात चिटकावीत होता. सुरज हा कटर आणण्यासाठी दुसर्‍या दुकानात गेला असता त्यावेळेस कैलास विलास माने सर तेथे आला व त्याने कचरू साळुंके यास घाण घाण शिवीगाळ करून येथे बॅनर चिटकावयाचे नाही असे सांगून मी तीन वर्षे उगाच झेल भोगून आलो आहे का असे म्हणून कोणाला तरी फोन केला व थोड्याच वेळात एका मोटारसायकलवरून तुषार हनुमंत पवार, बबलु जाधव व राहूल माने (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी तिथे पायी चालत आले. व त्यांनी कैलास माने सर यांना विचारले कोण आहे तेव्हा माने सर यांनी ते दोघे आहेत त्यांना जिवे मारूण टाका जिवंत सोडू नका असे म्हणताच बबलु जाधव याने विकास साळुंके याच्या तोंडावर चापट मारली तर राहूल माने याने छातीवर लाथ मारली तर तुषार हनुमंत पवार याने विकास यास जिवे मारण्याच्या उद्देशाने विकास यास तीन वेळा उचलून जमीनीवरील ब्लॉकवर आदळले. व लाथाबुक्क्यांनी त्याच्या तोंडावर पोटावर मारुन जखमी केले. तसेच दोन अनोळखी यांनी विकास यास उचलून आपटले.

यानंतर कैलास माने यांनी फिर्यादी सुरज निमोणकर याला जिवे मारूण टाका जिवंत सोडू नका असे म्हणताच बबलु जाधव याने सुरज यास जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन वेळा उचलून आपटले व इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे छातीवर, तोंडावर व कमरेवर मार लागला. यावेळी कॉम्प्लेक्स मधील लोक सोडवण्यासाठी आले असता त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले. व जाताना म्हणाले पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास गोळ्या घालून ठार मारू असे म्हणून निघून गेले अशी फिर्याद सुरज अशोक निमोणकर यांनी दिल्यावरून पोलीसांनी कैलास विलास माने, बबलू जाधव, तुषार हनुमंत पवार, राहुल मानेे व इतर दोन अनोळखी व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here