जामखेड प्रतिनिधी
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड,जिल्हा – नगर यांच्या वतीने जामखेड येथे ६ वा जागतिक मल्लखांब दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शक्तीची देवता पवनपुत्र हनुमानाची प्रतिमा व मल्लखांबाचे पूजन संस्थेचे सचिव अमोल (दादा) निमोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

प्रात्यक्षिके झाल्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. समारोपाच्या भाषणात बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बबलु (वस्ताद) टेकाळे यांनी मल्लखांबाचा इतिहास, व आपल्या महाराष्ट्राचा रांगडा खेळ असणारा मल्लखांब हा जगात पोहोचला पाहिजे असे मत व्यक्त करून मल्लखांब खेळाडूंना सदिच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष आणि प्रशिक्षक राजु (दादा) भांबे , आकाश(दादा) टेकाळे, वुशू कराटे नॅशनल चॅम्पियन सुरेश राऊत, रविदादा क्षिरसागर,अमनदादा भैसडे, बबलु राऊत, रोहन टेकाळे, तसेच जिल्हास्तरीय मल्लखांब विजेता खेळाडू रोनित खुपसे,तसेच मल्लखांबच्या सर्वच खेळाडूनी अथक परिश्रम घेतले.





