जामखेड प्रतिनिधी

मामा सोबत दवाखान्यात आलेली पाच वर्षाची चिमुकली ही अचानक शहरातील बीड रोडवरील एका हॉस्पिटल परीसरातुन हरवली होती. मात्र सोशल मिडीया, स्थानिक नागरिक व जामखेड पोलीसांच्या मदतीने अवघ्या एकाच तासात सदर मुलगी पुन्हा तीच्या मामाच्या ताब्यात देण्यात आली.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड पोलीस स्टेशनला खबर देणारे या मुलीचे मामा आश्रु क्षीरसागर रा. शिऊर ता. जामखेड. हे दि १३ रोजी सकाळी दवाखान्याच्या कामानिमित्त जामखेड येथे आले होते. या वेळी त्यांच्या सोबत त्यांची पाच वर्षाची चिमुकली देखील होती. मात्र सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ती जामखेड येथील बीड रोडवरील एका सोनोग्राफी सेंटर या ठीकाणाहुन अचानक गायप झाली. या नंतर तीच्या मामांनी तीचा शोध घेतला असता ती परीसरात मिळुन आली नाही. या नंतर मुलगी हरवल्याचा मॅसेज सोशल मिडीया च्या माध्यमातून अनेक व्हॉटसप ग्रृप मध्ये पडले होते. या नंतर तीच्या मामाने जामखेड पोलीस स्टेशनला येऊन माझी भाची श्रृती सिध्देश्वर सुतार वय ५ वर्षे ही हरवल्याची खबर दिली. या नंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पो. ना. हिंगसे पो. कॉ. गुडवाल महीला पो. कॉ धनवडे यांचे पथक मुलीचा शोध घेण्यासाठी पाठवले होते.

इकडे जामखेड शहरातील राळेभात वस्ती या ठिकाणी एक मुलगी सापडली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. हरवलेली मुलगी हीच आसल्याचे लक्षात आले त्यानंतर या पथकाने जामखेड मधिल कृष्णा संतोष बुरांडे, अमोल राळेभात, धिरज आनंदराव पाटील, उमेश अर्जुन राळेभात यांच्या मदतीने अवघ्या एका तासातच मुलीचा शोध घेऊन तीला जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आले व सदर मुलीला तीचे मामा संतोष आश्रु शिरसागर यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यामुळे मुलींच्या नातेवाईकांनी पोलीसांचे अभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here