जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील नान्नज या ठीकाणी एकास तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात तो बालंबाल वाचल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी नान्नज येथील तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट नुकसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की फीर्यादी वैभव विजय साबळे रा. ना नान्नज व साक्षीदार निलेश माने हे दि ९ रोजी नान्नज येथील एका हॉटेल च्या समोर फीर्यादी च्या घरासमोर होते. यातील आरोपी बाबा उर्फ इस्माईल महेबूब शेख रा. नान्नज, बाबु महीपती कुमटकर रा. राजेवाडी व लक्ष्मण महादेव काटे रा. नान्नज हे तीघे जण आले व विनाकारण फीर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच दुपारी आरोपी यांच्या कडे दुर्लक्ष केल्याचा राग पण आला होता. त्यामुळे याच दिवशी रात्री ९ वाजता आरोपी यांनी गैरकारभाराची मंडळी जमवून आरोपी नं एक याने त्याच्या हातातील तलवारीने फीर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी ही तलवार हुकली व फीर्यादी या घटनेतून बचावला. यामुळे या प्रकरणी फीर्यादी वैभव विजय साबळे याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीनही आरोपींन विरोधात आर्म अॅक्ट नुकसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई अनिलराव भारती हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here