केज प्रतिनिधी
घरात झोपलेल्या विद्यार्थ्यानींच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेला शिराजवळविषारी सापाने दोन वेळा चावा घेतल्याने या विद्यार्थ्यानीचा अंबाजोगाई येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना मुत्यू झाला.
केज तालुक्यातील सातेफळ
येथील उसतोड मजुर असणारे रामेश्वर साळुंके यांची मुलगी कु. पायल रामेश्वर साळुंके हि कळंब येथील महाविद्यालयात इयत्ता १२, वी च्या वर्गात शिक्षण घेत होती कु.पायल साळुंके की हि मुलगी दि, ९, जून गुरूवार रोजी दुपारी आपल्या घरी झोपलेली असताना तिच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेला शिराजवळविषारी सापाने चावा घेतला. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करून उपचार सुरू होते मात्र दि, १०, जुन शुक्रवार रोजी सदर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.






