माजी मंत्री राम शिंदेंना उमेदवारी, भाजपा कार्यकर्त्यांनी केला फटाके फोडून जल्लोष
जामखेड प्रतिनिधी
माजी मंत्री प्रा राम शिंदे यांना भाजपडुन विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर जामखेड शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करत त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. मै फीर लैट आऊगां या आशयाचे स्टेटस शिंदे त्यांनी ठेवले होते ते या उमेदवारी मुळे तंतोतंत जुळले आहे.

या वेळी माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, मोहन (मामा) गडदे, सोमनाथ राळेभात, बिबीशन धनवडे, प्रविण चोरडीया, पोपट (नाना) राळेभात, गोरख धनवट, प्रविण बोलभट, संपत (नाना) राळेभात, सोमनाथ पाचरणे, अल्ताफ शेख, विष्णुपंत गंभीरे, महेश मासाळ, अर्जुन म्हेत्रे, अभिजीत राळेभात, बाळासाहेब गायकवाड, सलिम बागवान, सलिम तांबोळी उद्धव हुलगुंडे, मोहन देवकते, तुषार बोथरा सह अनेक भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांचा पराभव झाला होता. विधानपरिषदेतील भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी तसेच युवा आमदार रोहित पवार यांच्या विरोधात राम शिंदे सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ मिळावे यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेचे आमदार करण्याची मागणी सुरू केली होती. यानुसार पक्षश्रेष्ठींनी राम शिंदेंची विधानपरिषद उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे कर्जत-जामखेड मधील कार्यकर्त्यांनी उमेदवारीचे नाव घोषित होताच शहरातील खर्डा चौकात दि ७ जुन रोजी रात्री ९ वाजता फटाके फोडून जल्लोष केला. या वेळी कार्यकर्त्यांनी राम शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतं होणार नाही घेतल्या शिवाय रहाणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी कार्यकर्त्यांच्या चेहर्यावरील आनंद दिसुन येत होता.

राज्यासभा निवडणुकीची तयारी पुर्ण होत आसतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या २० जुन रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि ९ जुन आहे. त्यामुळे १० जागांसाठी उमेदवारांचा नावाची घोषणा आज दि ८ जुन रोजी करण्यात येणार आहे. यामध्ये भाजप कडुन माजी मंत्री प्रा राम शिंदे व भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंढे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.राम शिंदे यांना उमेदवारी विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपाचे सर्व कार्यकर्ते त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.



