कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील राशीन पोलीस स्टेशन चे पोलीस हवलदार अण्णासाहेब बाबुराव चव्हाण वय ५२ वर्ष यास वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
याबाबत घडलेली घटना अशी की, तालुक्यातील भांबोरा येथील तक्रारदार यांच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलीस हवालदार अण्णासाहेब चव्हाण यांनी तक्रारदार यांना तीस हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार व श्री चव्हाण यांच्यामध्ये तडजोड होऊन वीस हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. यानंतर या प्रकरणी तक्रारदार यांनी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली होती.
ठरल्याप्रमाणे आज सात जुन्या दिवशी कर्जत तालुक्यातील राशीन येथे वीस हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. तक्रारदार याने वीस हजार रुपये घेण्यासाठी अण्णासाहेब चव्हाण यांना राशिन भिगवण रोडवरील खरात हॉस्पिटल समोर बोलवले होते. त्यानुसार श्री चव्हाण त्या ठिकाणी आली यानंतर तक्रारदार यांनी त्यांना वीस हजार रुपये दिल
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. त्यामध्ये अलगत सापडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सुनील कापसाने, अपर पोलीस अधीक्षक नारायण हळदे, पोलिस उपाधीक्षक सतीश भामरे, पर्यवेक्षण अधिकारी हरीश खेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्ड, पोलीस हवलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनार, संध्या मस्के, चालक हारुन शेख, राहुल डोळस यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.






