जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या धानोरा वंजारवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलने अकरा जागा जिंकत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व संपादन केले.
जाहीरात

धानोरा – वंजारवाडी सेवा सोसायटीची निवडणूक 4 जून रोजी पार पडली. 13 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या पॅनलला पराभवाची धूळ चारली आणि सोसायटीची सत्ता कायम राखली.

धानोरा वंजारवाडी सोसायटीत एकूण 675 सभासद आहेत. त्यापैकी 503 सभासद मतदानास पात्र होते.सोसायटी निवडणुकीमध्ये 503 सभासद मतदारांपैकी 474 मतदारांनी मतदान केले. तर 36 मतदान बाद झाल. या निवडणुकीत श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलने 11 जागांवर दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखली. या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून निलेश मुंडे, सचिव महेश शेटे यांनी काम पाहिले.

सत्ताधारी गटाचे कांतीलाल आण्णा जायभाय, सुदाम दत्तु जायभाय,रमेश गोरख ओमासे, शहाजी गिराम मिसाळ, अविनाश संजय पिंपळे, अंकुश रामा शिंदे,छबूबाई दिगांबर जायभाय, सुनंदा अशोक जायभाय,नवनाथ आप्पा कारंडे, तुकाराम किसन लोंढे , हिरालाल कांतीलाल शिंदे तर विरोधी गटाचे
शरद मधुकर शिंदे, अंजना किसन जायभाय हे उमेदवार विजयी झाले.


