जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथुन घोडेगाव येथे जात आसताना सारोळा गावानजीक मोटारसायकल खड्डात पडुन एक जणाचा जाग्यावरच मृत्यू झाला. ही घटना दि ४ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

जाहीरात

राजकुमार रत्नाकर शेळके. वय ४० मुकाम पोस्ट घोडेगाव, तालुका जामखेड, हल्ली मुक्काम पुणे आसे अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या ही घटनेत नेहमीप्रमाणे अपघात ग्रस्तांना तातडीने मदत करणारे जामखेड येथिल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना पोलिस कॉन्स्टेबल भागवत यांच्याकडून मिळाली या नंतर अपघाताची माहिती मिळताच कोठारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व आपल्या कोठारी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून सदर व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे आणला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. या कामी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सगर, पोलीस नाईक भागवत हे या घटनेचा तपास करत आहेत. तसेच या कामी महेंद्र शिरसागर यांनी कोठारी यांना मदत केली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here