जामखेड प्रतिनिधी

जामखेड खर्डा रोडवरील जमदारवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप कर्मचारी झोपले आसताना फीर्यादी याच्या खिशातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये रोख चोरून खिसा साफ केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहीरात

फीर्यादी मल्हारी भाऊसाहेब कोल्हे वय 39 वर्ष धंदा, पेट्रोलपंप सेल्समन रा. राजुरी तालुका जामखेड व आनखी एक कर्मचारी साक्षीदार आसे दोघे दि २९ मे २०२२ रोजी रात्री जामखेड पासुन आठ कीमी अंतरावरील खर्डा रोडवरील जमदारवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर झोपले असताना मध्यरात्री आडीच वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्याने ३० हजार रुपये रोख रक्कम चोरुन खिसा साफ केला.

जाहीरात

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला फीर्यादी कर्मचारी मल्हारी भाऊसाहेब कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. भागवत हे करत आहेत.

जाहीरात

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here