जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल मारुती नामदेव फडताळे वय ७६ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असुन त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि ३ जुन रोजी नागेश्वर मंदिर परिसरात होणार आहे.
ADVERTISEMENT

जामखेड येथिल निवृत्त मारुती नामदेव फडताळे हे नगर येथे न्यायालय अधिक्षक म्हणून सेवा करत होते. ते गेल्या १७ वर्षांपुर्वीच सेवा निवृत्त झाले होते. दि २५ रोजी रात्री त्यांचे रहात्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, पत्नी, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि ३ जुन रोजी नागेश्वर मंदिर येथे सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे.





