जामखेड प्रतिनिधी

विधान सभेतून निवडून राज्यसभेवर देण्याच्या जागांपैकी एका जागेवर कोंग्रेसने प्रदेश युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यावी. अशी मागणी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले पाटिल यांनी या बाबतचे पत्र त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी , काँग्रेस नेते राहुलजी गांधी,प्रभारी एच. के. पाटिल, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले .

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी निवडीनंतर सत्यजीत तांबे यांनी राज्यभर दौरा करून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांना काँग्रेस पक्षाकडे आकर्षित केले.
त्यांनी विधानसभा निवडणूकीत राज्यात दौरा करून पक्षाचे उमेद्वार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. २०१९ साली राज्यात युवक काँग्रेस मार्फ़त सुपर ६० उपक्रम राबवून काँग्रेस पक्षाच्या ४४ जागा निवडून आल्या, युवक काँग्रेस चे कार्यकर्ते,पधारिकारी साठी सुपर १००० उपक्रम घेउन ज़ास्तित ज़ास्त युवक स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये निवडून आले.
तसेच त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन व्हावे यासाठी काँग्रेस नेतृत्व कडेही प्रयत्न केले होते. पक्ष पातळीवर यशस्वी कामगिरी नंतर तांबे यांना संसदेत काम करण्याची संधी मिळावी. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळात अनेक युवकांना संधी मिळाली आहे .
त्यामुळे तांबे यांना राज्य सभेवर संधी मिळावी असे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले पाटिल यांनी पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here