अहमदनगर (प्रतिनिधी) :- ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २८ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत राष्ट्रवादी भवन सभागृह, नगर पुणे रोड, अहमदनगर येथे जिल्हास्तरीय खुल्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या संघास अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, व ५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर १० पेक्षा अधिक संघाच्या प्रवेशिका प्राप्त झाल्यास रुपये तीन हजारचे एक उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. खुल्या समूह नृत्य स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धक संघाने आपली नाव नोंदणी शुक्रवार दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम शिंदे (मो.९८६०२४५३८७) व स्पर्धा प्रमुख ऐश्वर्या नवगिरे (मो. ८६६८५११४२२) यांचेकडे करणे असे आवाहन कार्याध्यक्ष भगवान राऊत, सरचिटणीस रियाज पठाण, चिटणीस अजयकुमार पवार, शिवानंद भांगरे, हसनशेख पाटेवाडीकर, जयश्री जगताप, उपाध्यक्ष प्रा. मफिज इनामदार, नाना मोरे, शिवशाहीर कल्याण काळे, हमीद सय्यद, शिवकन्या बडे, दिलीप शिंदे, संघटक डॉ. संदीप सांगळे, प्रवक्त्या डॉ. रत्ना वाघमारे, संघटक सचिव शहाजहान तांबोळी, कोषाध्यक्ष निखिल बनसोडे, सदस्य मुनीर सय्यद, राधाकृष्ण कराळे व सचिन बनसोडे यांनी केले आहे.
नगर शहराचे आ. संग्रामभैय्या जगताप हे या नृत्य स्पर्धेचे स्वागताध्यक्ष असून आ. अरुण काका जगताप, ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, पारनेरचे आ. निलेश लंके, कर्जत – जामखेडचे आ. रोहित पवार, अकोल्याचे आ. डॉ. किरण लहामटे, कोपरगावचे आ. आशुतोष काळे, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष प्रा.माणिक विधाते, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण होणार आहे.





