जामखेड प्रतिनिधी
अहिल्यादेवींच्या ऐतिहासिक जन्म गावा चोंडीकडे जाणाऱ्या चापडगाव येथील मुख्य प्रवेशद्वार वर्षांनुवर्षे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते प्रवेशद्वार दुरावस्थेत होते. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी येथे होणाऱ्या जयंती उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मात्र बाबत दुर्लक्षित आसलेल्या प्रवेशद्वाराचे शुशोभीकरण करावे या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने देखील निवेदन दिले होते. अखेर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून या प्रवेशद्वाराचे शुशोभीकीकरणाचे काम झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कर्जत तालुक्यातून अहिल्यादेवींच्या ऐतिहासिक जन्म गावाकडे जाणारे मुख्य प्रवेशदवार चापडगाव येथे आहे .ते अनेक वर्षांपासून दुरअस्थेत आहे . त्यावर राजकिय जाहिरातींचे बोर्ड लावले जात होते. प्रवेशद्वारावरील राजकीय व इतर बनार , स्टीकर . झेंडे . हटवावेत व पुन्हा हे न व्हावे याची कायमची तजबीज करावी व प्रवेशद्वाराचे शुशोभीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाच्या वतीने करण्यात आली होती.
३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी येथे होणाऱ्या जयंती उत्साहाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून चौंडी गावाचा विकास व सुशोभीकरण सुरू आहे. याच माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी चापडगाव येथे आसलेल्या प्रवेशद्वाराचे देखील रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त प्रवेशद्वाराबरोबरच चौंडी येथे आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून सुशोभीकरण, रंगरंगोटी, डागडुजी तसेच स्वच्छता मोहिम व डेकोरेशन मंडप सह जोरदार जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सरपंच सुनिल उबाळे व अक्षय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
अध्यक्ष शरद पवार रहाणार उपस्थित
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे होणाऱ्या अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार राहणार उपस्थित राहणार आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले असून त्यांनीही हे निमंत्रण स्विकारून उपस्थित राहण्याचे मान्य केले असल्याचे समजते. तसेच महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री व पक्षाचे मान्यवर नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.





