जामखेडचे भुमीपुत्र प्राचार्य काकासाहेब मोहिते यांना जामखेड भुषण पुरस्कार जाहीर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा जामखेड भूषण पुरस्कार शिरुर येथील सी.टी बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. काकासाहेब मोहिते यांना जाहीर करण्यात आलेला असून दि. २४ मे रोजी जामखेड येथे सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी शशिकांत देशमुख यांनी दिली.
ADVERTISEMENT

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीने यावर्षी पासून जामखेड भूषण पुरस्कार संस्थेच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जामखेड तालुक्यातील शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, उद्योग, साहित्य, किडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येणार असून सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
२०२२ या वर्षीचा पहिला जामखेड भूषण पुरस्कार जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील रहिवासी व शिरुर येथील सी. टी. बोरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांना जाहिर करण्यात आला असून संस्थेचे अध्यक्ष श्री. उद्धवराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केलेली आहे. सदर पुरस्कार आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.





