जामखेड प्रतिनिधी
प्रशासनाच्या अधिकार्यांना विश्वासात घेतल्या शिवाय विकास होत नाही. सर्व सामान्य जनतेची अडवणुक न होता कामे झाली पाहिजेत. त्यामुळे होय विरोधकांनो माझा दबाव अधिकार्यांवर आसतो मात्र तो दबाव आदरयुक्त आसतो हे विरोधकांना माहीत नसावे असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणार्या ३२ निवासस्थानाचा भुमीपुजन सोहळा दि १६ रोजी आ. रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, संजय वराट, अमोल राळेभात, राहुल उगले, रमेश आजबे, राजेंद्र पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, महीला व बालकल्याण अधिकारी ज्योती बेल्हेकर, डॉ सुनील बोराडे, सरपंच प्रशांत शिंदे, पं. स. कृषी अधिकारी अशोक शेळके, अॅड हर्षल डोके, ग्रामसेवक युवराज ढेरे, प्रशांत सातपुते, अमित जाधव, ईस्माईल सय्यद, संध्या सोनवणे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT

पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की रस्ते, लाईट व पाणी या विकास कामाबरोबरच सर्व सामान्य जनते पर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचा माझा प्रयत्न आसतो.राष्ट्रीय महामार्ग आसो कींवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांची कामे आसो या कामांचा आढावा घेऊन चांगल्या दर्जाची कामे होण्यासाठी मी बैठका घेत आसतो. कर्जत जामखेड मध्ये ४५० पानंद रस्ते तयार केले आसुन आनखी १२०० पानंद रस्ते तयार करायचे आहेत. एकुण १४ कोटी रुपयांचे पानंद रस्ते तयार करायचे आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या आडचणी सोडवण्याचे काम केले आहे.
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी एका ठिकाणी थांबले पाहिजेत त्यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास मदत होईल या साठी पंचायत समिती, तलाठी कर्मचाऱ्यारी, आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचे काम सुरू केले आहे. तहसील कर्मचाऱ्यांच्या जांबवाडी रोड येथे १२ कोटींची निवासस्थाने, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांसाठी ३० कोट रुपये मंजूर केले आहेत. तसेच त्यांच्या साठी बास्केटबॉल ची सुविधा देखील करण्यात आली आहे. तसेच शहरातील धार्मिक स्थळांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आसल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली.





