जामखेड प्रतिनिधी

जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणार्‍या ३२ निवासस्थानाचा भुमीपुजन सोहळा उद्या दि १६ रोजी आ. रोहित पवार यांच्या हस्ते होणार संपन्न होणार आहे. या मुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे.               

ADVERTISEMENT

 

गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची रहाण्याची गैरसोय होत होती. हीच गैरसोय लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी या बाबत कर्मचाऱ्यांच्या निवासा बाबत अडचणी समजून घेतल्या. आणि तातडीने या निवास बांधण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून ३२ निवासस्थानासाठी १० कोटी ९१ लाख रुपये मंजूर झाले. याचा भुमीपुजन सोहळा उद्या दि १६ रोजी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच आय टी आय हॉस्टेल च्या कामांची पहाणी व शहरातील विविध दालनांचा शुभारंभ देखील आ. रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here