आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील धामनगाव जवळ घाटा पिंपरी येथे क्रेटा कारला बुधवारी रात्री च्या सुमारास झालेल्या अपघातात बीड येथील एकाच व्यापारी कुटुंबातील चौघांचा मृत्यु झाला आहे. चालक गंभीर जखमी आहे.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बीड मधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. घाटा पिंपरी जवळील घाटात त्यांची क्रेटा गाडी रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी ,लखन टेकवाणी या चौघांचा जागीच मृत्यु झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. टेकवाणी कुटुंब बीडमधील धांडे गल्ली येथील कारंजा परीसरात रहात होते. टेकवाणी कुटुंब हे एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंभोरा पोलीस ठाण्याचे पीएसआय देशमाने , भडके , कांबळे मेजर ड्रायवर देवडे , पवार , वामन यांनी घटना स्थळी धाव घेतली.






