जामखेड प्रतिनिधी

शहरात नव्याने ओरोग्य सेवेत दाखल होत असलेल्या समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा शुभारंभ मंगळवारी (दि.३ मे ) परमपूज्य पांडुरंग देवा (शास्त्री )देशमुख आणि सौ.विमल पोपट दारकुंडे श्री पोपट केरु दारकुंडे या दाम्पत्याच्या हस्ते होणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या अध्यक्षते खाली होणा-या कार्यक्रमास खा.सुजय विखे पाटील, आ. रोहित पवार, आ. सुरेश धस, माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार असून, या कार्यक्रमास
डॉ. राहुल धूत ,डॉ. अभिजित पाठक ,डॉ. मोहम्मद माजिद, डॉ. अमीत बडवे, तहसीलदार योगेश चंद्रे ,वैद्यकीय अधीक्षक डाॅ.संजय वाघ, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड ,ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक रवी आरोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे ,जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते ,वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे ,डॉ. भरत देवकर ,डॉ राजकुमार गायकवाड, डॉ नीरज गांधी, डॉ.शार्दुल कुलकर्णी, डाॅक्टर असोशियनचे उपाध्यक्ष डॉ सादिक पठाण उपस्थित राहणार आहेत.

समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भरत दारकुंडे यांनी हे हॉस्पिटल सुरू केले असून, डॉ. अमोल भगत (एम डी मेडिसिन हृदयरोग व मधुमेह तज्ञ) डॉ. पूजा भगत स्त्री रोग तज्ञ,तसेच डॉ अर्जुन शेळके (एम. बी. बी. एस. एचडी अर्थो हाडांचे तज्ञ) यांच्या मार्फत हॉस्पिटल मध्ये रुग्णांना २४ तास सेवा मिळणार आहे. हे हॉस्पिटल शहरातील बीड रस्त्यावरील विश्वक्रांती चौकातील सुसज्ज इमारतीत होत असून, या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग , डायलेसिस विभाग,सर्पदंश, विषबाधा, हार्ड अटॅक, उच्च रक्तदाब , मधुमेह ,अर्धांग वायू ,मेंदूचे विकार ,किडनीचे विकार ,लिव्हरचे, त्वचारोग ,थायरॉईड ग्रंथीचे विकार, सुसज्य अंतररुग्ण विभाग ,जनरल मेडिसिन विभाग या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केले असून, माफक दरात रुग्णांची सेवा करणार असल्याचा मानस हॉस्पिटलच्या संचालक डॉ भरत दारकुंडे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here