जामखेड प्रतिनिधी

जावेद हबीब म्हणजे हेअर केअर क्षेत्रातील एक मोठे नाव, केवळ भारतातच नाही तर जगभरात जावेद हबीब हे नाव प्रसिद्ध आहे. मोठमोठे सेलिब्रिटीज त्यांच्याकडूनच आपल्या हेअर स्टाईल करून घेतात. सामान्य माणसाची सुद्धा अशी इच्छा असते की एकदा तरी जावेद हबीब सलून मध्ये जाऊन हेअरस्टाईल करून घ्यावी. आणि याच सामान्य माणसांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी आता जामखेड मध्ये देखील जावेद हबीब हेअर आणि ब्युटी ची शाखा सुरू झाली आहे असे मत प्रसिद्ध उद्योजक रमेश गुगळे यांनी व्यक्त केले. 

जामखेड शहरातील बीड रोडला नुकतेच दि ७ रोजी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आसलेले जावेद हबीब हेअर सलुन आणि ब्युटी च्या शाखेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी बिझनेस डेव्हलपमेंट अॉफीसर हीना मॅडम, मेन फ्रेंचायसी अॉफीसर अरविंद कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोठारी, उद्योजक रमेश गुगळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी , पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, नगरसेवक अमित चिंतामणी, पवनराजे राळेभात, बब्बु पठाण, शरद कार्ले, विजयसिंह गोलेकर, संचालक तुषार कोक्रेजा, सौ. साक्षी कोक्रेजा, प्रविण शिलवंत, सौ मयुरी शिलवंत, विजय डोंगरे, सौ. मिरा डोंगरे, फॅशन कोरिओग्राफर विद्या लाटे कांबळे, अँकर व सीलेब्रेटी प्रनोती कदम, परीक्षक स्नेहा महाजन, व हर्षा शर्मा रमेश आजबे, अजय कोठारी, गणेश डोंगरे, माऊली जरांगे, शिवकुमार डोंगरे, सागर पवार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बिजनेस डेव्हलपमेंट अॉफीसर हीना मॅडम बोलताना म्हणाल्या की लोकांना सुंदर बनवण्याचे काम जावेद हबीब मेन्स वेअर व ब्युटी पार्लर करत आहे. मेट्रो सीटी नंतर आम्ही जामखेड येथे तालुका लेवलवर शाखा उघडली आहे. मुंबई- पुण्या प्रमाणे सेवा जामखेड मध्ये देखील आपणास मिळणार आहे असे मत व्यक्त केले. यानंतर मेन फ्रेंचायसी अॉफीसर अरविंद कुमार यांनी सांगितले की जावेद हबीब एक ब्रॉडण नसुन तरुणांना रोजगार देण्याचे काम करत आहेत. संपुर्ण भारतात याच्या शाखा आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील प्रसिद्ध अँकर व सीलेब्रेटी प्रनोती कदम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here